आयफोनला हॅकिंगचा धोका; ॲॅपलने भारतासह ९२ देशांना पाठवला इशारा

गेल्या ऑक्टोबरमध्ये कंपनीने भारतातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या आयफोनवर संभावित हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र, काही ठरावीक हल्लेखोरांचा ते छडा लावू शकले नाहीत, असे ॲॅपलने सांगितले.
आयफोनला हॅकिंगचा धोका; ॲॅपलने भारतासह ९२ देशांना पाठवला इशारा

न्यूयॉर्क : जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी ॲॅपलने भारतासहित जगातील ९२ देशांना आयफोनवर हॅकिंगचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. या देशांतील आयफोन वापरकर्त्यांवर ‘मर्सनेरी स्पायवेअर’चा हल्ला होऊ शकतो. यापूर्वी ॲॅपलने भारतीय राजकारण्यांना याबाबत ॲलर्ट पाठवला होता.

ॲॅपलने बुधवारी रात्री एक अधिसूचना काढून जगातील ९२ देशांतील वापरकर्त्यांना सूचना दिली. त्यात कंपनीच्या वापरकर्त्यांवर ‘मर्सनेरी स्पायवेअर’चा हल्ला होऊ शकतो. यात इस्रायलमध्ये बनवलेल्या ‘पेगासस स्पायवेअर’चाही समावेश आहे. काही ठरावीक वापरकर्त्यांना टार्गेट बनवून ‘स्पायवेअर’चा वापर केला जात आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये कंपनीने भारतातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या आयफोनवर संभावित हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र, काही ठरावीक हल्लेखोरांचा ते छडा लावू शकले नाहीत, असे ॲॅपलने सांगितले.

ॲॅपलकडून किती लोकांना सूचना मिळाली हे स्पष्ट झाले नाही. या ईमेलमध्ये एनएसओ समूहाच्या ‘पेगासस स्पायवेअर’चा उल्लेख केला गेला. या ‘स्पायवेअर’सारख्या टूलचा वापर जागतिक स्तरावर लोकांना टार्गेट करण्यासाठी केला जात आहे. स्पायवेअर हल्ला हा आयफोन वापरकर्त्यांसाठी मोठा धोका असू शकतो. या स्पायवेअरमुळे तुमचा आयफोन हॅक होऊ शकतो. तुम्हाला टार्गेट करून हल्ला होण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे नाव व तुमचे काम पाहून टार्गेटची शक्यता आहे.

या हल्ल्यांमध्ये खूप पैसा खर्च होतो. केवळ काही लोकांना टार्गेट केले जाते. अज्ञात लिंक व फाइल्सपासून सावधान राहावे, असा सल्ला कंपनीने दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in