११ कंपन्या, ७ हजार कोटी! IPO बाजारात चालू आठवड्यात निधी सज्जता

प्राथमिक बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. रेंटोमोजो, करमतरा इंजिनिअरिंग आणि मनोहर इलेक्ट्रिकल्स यांसारख्या ११ प्रमुख कंपन्या त्यांच्या प्राथमिक भागविक्रीद्वारे (आयपीओ) ७,०५५ कोटी रुपये उभारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
११ कंपन्या, ७ हजार कोटी! IPO बाजारात चालू आठवड्यात निधी सज्जता
११ कंपन्या, ७ हजार कोटी! IPO बाजारात चालू आठवड्यात निधी सज्जताप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : प्राथमिक बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. रेंटोमोजो, करमतरा इंजिनिअरिंग आणि मनोहर इलेक्ट्रिकल्स यांसारख्या ११ प्रमुख कंपन्या त्यांच्या प्राथमिक भागविक्रीद्वारे (आयपीओ) ७,०५५ कोटी रुपये उभारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

हे सर्व आयपीओ ७ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान बाजारात येणार असून, बहुतेक कंपन्यांचे इश्यू मंगळवार आणि बुधवारी अर्जांसाठी उपलब्ध होतील.

प्राथमिक बाजारात उतरणाऱ्या या कंपन्यांमध्ये रिअल इस्टेट डेव्हलपर्स, इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्युशन्स प्रदाता, स्पेशालिटी केमिकल्स उत्पादक आणि ऑनलाइन रेंटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

एकूण ७,०५५ कोटी रुपयांपैकी २,७२२ कोटी रुपये (३९ टक्के) नवीन शेअर्सच्या विक्रीद्वारे उभारले जातील, ज्यांचा निधी थेट कंपनीकडे जाईल. तर ४,३३३ कोटी रुपये (६१ टक्के) हे विद्यमान भागधारकांद्वारे 'ऑफर फॉर सेल' (ओएफएस) अंतर्गत विकले जातील.

प्रणव कन्स्ट्रक्शन्स : प्रति शेअर ₹११८ - ₹१२४ प्राईस बँड मनोहर इलेक्ट्रिकल्स : ₹१,०५६ कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर ₹६०१ - ₹६३२ प्राईस बँड

प्रसोल केमिकल्स : ₹५०० कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर ₹६४३ - ₹६७६ प्राईस बँड

ग्लास वॉल सिस्टिम (इंडिया) : ₹४२८ कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर ₹१७२ - ₹१८२ प्राईस बँड

रेंटोमोजो : ₹१,२५६ कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर ₹३८४ - ₹४०४ प्राईस बँड

करमतरा इंजिनिअरिंग : ₹८७५ कोटींचा आयपीओ. प्राईस बँड ₹२४१-₹२५४ प्रति शेअर

मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्युशन्स : ₹८०५ कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर ₹३२२ - ₹३३९ प्राईस बँड.

आर्सिल : ₹७३३ कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर ₹१३२-₹१३९ प्राईस बँड

एलसीसी प्रोजेक्ट्स : ₹४२७ कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर ₹१३९-₹१४६ प्राईस बँड

स्टीमहाऊस इंडिया : आयपीओद्वारे ₹४१४ कोटी उभारणार.

व्हीगालँड डेव्हलपर्स : नवीन शेअर्सच्या विक्रीद्वारे ₹२१० कोटी उभारणार

बीव्हीजी इंडिया ३०० कोटी उभारणार

भारतातील एकात्मिक सुविधा व्यवस्थापन क्षेत्रातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड भांडवली बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने प्राथमिक भागविक्रीद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक 'सेबी'कडे मसुदा दस्तावेज सादर केले आहेत. या आयपीओमध्ये ₹३०० कोटींपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. निधीचा वापर विविध कामांसाठी केला जाईल.

कंपनीविषयी माहिती

हणमंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील बीव्हीजी इंडिया (भारत विकास ग्रुप) ही भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक सुविधा व्यवस्थापन सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. कंपनी औद्योगिक, ग्राहक क्षेत्र, रुग्णालय, वाहतूक आणि सरकारी आस्थापनांना स्वच्छता, आपत्कालीन वैद्यकीय सेवा (१०८ रुग्णवाहिका सेवा), सुरक्षितता आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या विविध सेवा पुरवते. टाटा मोटर्स, हुंदाई, बजाज ऑटो, ओएनजीसी, एनटीपीसी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांसारख्या प्रमुख कंपन्या बीव्हीजीच्या ग्राहक वर्गात समाविष्ट आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in