
पोरबंदर : गुजरातच्या पोरबंदर येथील एका न्यायालयाने आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना १९९७ मध्ये कोठडीत त्रास दिल्याच्या खटल्यातून मुक्त केले आहे. भट्ट यांनी गुन्हा कबूल करण्यासाठी त्रास दिल्याचे याचिकाकर्ता कोर्टात सिद्ध करू शकला नाही. तसेच भट्ट हे पोलीस अधिकारी होते. त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगीही घेतली नव्हती.
मात्र, संजीव भट्ट हे तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. कारण १९९० च्या अन्य एका प्रकरणात ते तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.