आता भारताला इराणचे तेल; सात वर्षांनंतर पहिल्यांदाच

२०१९ नंतर इराणच्या कच्च्या तेलाची पहिली खेप भारतात गुजरात राज्यातील एका बंदराकडे येत आहे. अमेरिकेने नुकतीच निर्बंधांमध्ये सवलत दिल्यानंतर, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या समुद्रातील इराणच्या तेलाचे काही साठे खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.
आता भारताला इराणचे तेल; सात वर्षांनंतर पहिल्यांदाच
आता भारताला इराणचे तेल; सात वर्षांनंतर पहिल्यांदाच
Published on

नवी दिल्ली : २०१९ नंतर इराणच्या कच्च्या तेलाची पहिली खेप भारतात गुजरात राज्यातील एका बंदराकडे येत आहे. अमेरिकेने नुकतीच निर्बंधांमध्ये सवलत दिल्यानंतर, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या समुद्रातील इराणच्या तेलाचे काही साठे खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. ‘केपलर’मधील रिफायनिंग आणि मॉडेलिंगचे मुख्य संशोधन विश्लेषक सुमित रितोलिया यांनी सांगितले की, भारत-इराण तेल व्यापार पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. प्रादेशिक संघर्षामुळे अमेरिकन प्रशासनाने समुद्रात असलेल्या इराणच्या तेलासाठी ३० दिवसांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर, ‘पिंग शुन’ हे जहाज ६ लाख पिंप कच्चे तेल घेऊन वाडिनारकडे निघाले आहे. मे २०१९ नंतरची ही पहिलीच डिलिव्हरी असून, कच्च्या तेलाच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीय तेल कंपन्यांसाठीही महत्त्वाची वेळ आहे." खरेदीदाराची ओळख अद्याप समोर आलेली नाही, परंतु वाडिनार येथे रशियन तेल कंपनी रोसनेफ्ट पुरस्कृत ‘नयारा एनर्जी’ची वार्षिक २० दशलक्ष टनाची रिफायनरी आहे. तसेच, हे बंदर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बिना रिफायनरीसारख्या अंतर्गत भागांतील रिफायनरींसाठी कच्चे तेल उतरवण्याचे प्रमुख ठिकाण आहे. एकेकाळी भारताच्या एकूण तेल आयातीमध्ये इराणचा वाटा ११.५% होता.

logo
marathi.freepressjournal.in