इराणला जोरदार प्रत्युत्तर देणार; नेतान्याहू यांचा इशारा

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्धविषयक कॅबिनेटची आणीबाणीची बैठक बोलावली होती. यात सर्व नेत्यांनी प्रत्युत्तरादाखल कारवाईचे समर्थन केले. इस्रायलला धडा शिकवण्याची काळ व वेळ लवकरच ठरवली जाईल, असे बेन्जामिन नेतान्याहू यांनी सांगितले.
इराणला जोरदार प्रत्युत्तर देणार; नेतान्याहू यांचा इशारा

जेरुसलेम : इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील वाद टोकाला गेला आहे. इराणला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी दिला आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्धविषयक कॅबिनेटची आणीबाणीची बैठक बोलावली होती. यात सर्व नेत्यांनी प्रत्युत्तरादाखल कारवाईचे समर्थन केले. इस्रायलला धडा शिकवण्याची काळ व वेळ लवकरच ठरवली जाईल, असे नेतान्याहू यांनी सांगितले.

अमेरिकेने केले हात वर

इराणला प्रत्युत्तर देताना इस्रायलला मदत केली जाणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून कोणतीही पावले उचलताना सावधानता बाळगावी, असा सल्ला दिला. संयुक्त राष्ट्रात इराणच्या दूताने सांगितले की, इस्रायलवर केलेला हल्ला हा त्याच्या कारवाईचे प्रत्युत्तर होते. आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले. दमास्कस येथील आमच्या वाणिज्य राजदूतांवर केलेल्या हल्ल्याबद्दल इस्रायलला हे प्रत्युत्तर देण्यात आले, तर संयुक्त राष्ट्रात इस्रायलचे प्रतिनिधी गिलाद एर्दान यांनी इराणवर कठोर प्रतिबंध लावण्याची मागणी केली.

दरम्यान, अमेरिकेने या वादापासून दूर राहावे, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा इराणने दिला. संयुक्त राष्ट्रात इराणच्या दूताने सांगितले की, इस्रायलवर केलेला हल्ला हा त्याच्या कारवाईचे प्रत्युत्तर होते. आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले. दमास्कस येथील आमच्या वाणिज्य राजदूतांवर केलेल्या हल्ल्याबद्दल इस्रायलला हे प्रत्युत्तर देण्यात आले, तर संयुक्त राष्ट्रात इस्रायलचे प्रतिनिधी गिलाद एर्दान यांनी इराणवर कठोर प्रतिबंध लावण्याची मागणी केली. दरम्यान, अमेरिकेने या वादापासून दूर राहावे, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा इराणने दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in