

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) तर्फे मध्य प्रदेशातील यात्रेकरूंकरिता भारत गौरव पर्यटक रेल्वेचे विशेष धार्मिक पर्यटन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी रीवा येथून “२ ज्योतिर्लिंगांसह दक्षिण दर्शन यात्रा” प्रस्थान करणार आहे.
ही रेल्वे रीवा, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, इटारसी, बैतूल, नागपूर आणि सेवाग्राम या स्थानकांवरून प्रवास करणार असून, या सर्व स्थानकांवरून प्रवासी रेल्वेत चढू शकतील. या १० रात्री/११ दिवस कालावधीतील यात्रेत तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी आणि श्रीशैलम (मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग) या प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
आयआरसीटीसी पश्चिमी क्षेत्र, मुंबईचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी सांगितले की, हे सर्वसमावेशक टूर पॅकेज यात्रेकरूंना सुरक्षित, सुखद आणि विनासायास प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
प्रवास भाडे (प्रति प्रवासी)
एसएल - इकॉनॉमी श्रेणी: २०,४०० रु.
थर्ड एसी - स्टँडर्ड श्रेणी: ३३,७०० रु.
सेकंड एसी - कम्फर्ट श्रेणी: ४४,५०० रु.
पॅकेजमध्ये पुढील सुविधा समाविष्ट आहेत :
भारत गौरव रेल्वेच्या विशेष एलएचबी रेकमधील आरामदायी रेल्वे प्रवास
प्रवासादरम्यान ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
सर्व दर्शनीय स्थळांसाठी उत्तम दर्जाच्या बसद्वारे स्थानिक परिवहन
धर्मशाळा / हॉटेलमधील निवास व्यवस्था, संपूर्ण प्रवासात टूर एस्कॉर्ट्स,
सर्व प्रवाशांसाठी प्रवास विमा, ऑन-बोर्ड सुरक्षा आणि हाऊसकीपिंग सेवा
इच्छुक प्रवासी आपली बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर ऑनलाइन करू शकतात: www.irctctourism.com तसेच अधिकृत एजंटमार्फतही बुकिंग उपलब्ध आहे.