
नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवाशांना अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या आयआरसीटीसीच्या बेवसाइट व ॲॅपमध्ये मंगळवारी बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांचे पैसे कापूनही त्यांना तिकिटे मिळू शकली नाहीत. १० तासांनंतर ही सेवा पूर्ववत झाली.
रेल्वे तिकीट काढण्यासाठी बहुतांशी प्रवासी आयआरसीटीसीच्या ॲॅप व वेबसाइटचा वापर करतात. नेहमीप्रमाणे लाखो प्रवासी तिकीट काढण्यासाठी ॲॅप व वेबसाइटवर गेले, मात्र त्यांना तिकीट काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. १० तासांनंतर ही साइट पूर्ववत झाली.
अनेकांचे पैसे कापले गेले, तरीही तिकीट बुकिंग झाले नाही. काही जणांनी तीन-तीन वेळा पैसे भरले. तरीही तिकीट बुक झाले नाही. आता हे प्रवासी आपले पैसे परत मागत आहेत.
बुकिंगसाठी ‘दिशा’चा वापर करावा!
तांत्रिक अडचणींमुळे वेब व ॲॅपमध्ये पेमेंटची समस्या येत आहे. प्रवाशांनी ‘दिशा’चा वापर करून तिकीट बुकिंग करावी. तसेच प्रवाशांनी ई-वॉलेटचा वापर करून तिकीट बुकिंग करावी. ज्या प्रवाशांचे पैसे कापले गेले आहेत, त्यांचे पैसे ५ ते ६ दिवसांत परत केले जातील.
आयआरसीटीसी, अधिकारी