हवामानातील बदलामुळे अ‍ॅलर्जी सारखा त्रास होतोय? खजूर खा, खजूरांमध्ये आहेत 'हे' महत्वाचे गुणधर्म

खजूर हा रेचक असून यामध्ये सोल्युबल फायबरची मात्र जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास असणाऱ्यांनी खजुराचे सेवन करावे.
हवामानातील बदलामुळे अ‍ॅलर्जी सारखा त्रास होतोय? खजूर खा, खजूरांमध्ये आहेत 'हे' महत्वाचे गुणधर्म
PM

कधीतरी जेवण झाल्यानंतरही अवेळी भूक लागल्याची भावना होते, किंवा कधी अगदी गळून गेल्यासारखे वाटते, तर कधी काहीतरी गोड पण शरीरास पोषक असे काहीतरी खावेसे वाटते.. अश्या वेळी खजूर निवडावा. काही तरी गोड खाण्याची अनिवार इच्छा, वजन आणि आकारमानाची काळजी करायला न लावता, खजूर पूर्ण करतो, खजुराचे झाड। 3 हे जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या झाडांच्या प्रजातींमध्ये सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक आहे. ही झाडे साधारण दहा हजार वर्षांपूर्वी सौदी अरेबिया मध्ये लावण्यात आली. इस्लाम धर्मामध्ये खजुराच्या सेवनाला अनन्यसाधारण महत्व आहे. मुहम्मद पैगंबर आपल्या अनुयायांना खजूर आणि पाण्याचे सेवन करून रमजानच्या पवित्र महिन्यातील उपवासांची सांगता करण्यास सांगत असत अशी आख्यायिका आहे. सौदी अरेबिया येथे तीनशे हून ही अधिक निरनिराळ्या प्रकारच्या खजुराच्या प्रजातींचे उत्पादन होते.

खजूरामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि क्षार आहेत, तसेच यामध्ये कॅल्शियम, लोह, फोस्फोरस, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक यांसारखे शरीरास पोषक क्षार आहेत. यामध्ये थियामीन, रिबोफ्लाविन, नियासिन, फोलेट, अ आणि के जीवनसत्वेही मुबलक प्रमाणात आहेत. हृदयास अपायकारक असणारे कोलेस्टेरोल खजूरामध्ये अजिबात नाही. त्यामुळे खजूर हा सर्व दृष्टींनी योग्य असा पदार्थ आहे. खजुराच्या सेवनाने बद्धकोष्ठाच्या त्रासापासून आराम मिळतो. खजूर हा रेचक असून यामध्ये सोल्युबल फायबरची मात्र जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास असणाऱ्यांनी खजुराचे सेवन करावे. दोन ते तीन खजूर रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर त्या पाण्यासकट खजूरांचे सेवन करावे. त्याचप्रमाणे शरीरामध्ये रक्ताची किंवा लोहाची मात्रा कमी असल्यास ही खजुराच्या सेवनाने फायदा होतो. खजूराने रक्तामधील लोहाची मात्रा वाढून अनिमिया दूर करण्यास मदत मिळते.

काही व्यक्तींना हवामानातील बदलामुळे अलर्जी सारखा त्रास होतो. सर्दी होणे, दम लागणे, त्वचेवर पुरळ उठणे अश्या निरनिराळ्या प्रकारच्या अ‍ॅलर्जी उद्भवू लागतात. हवामान सुधारले की त्याबरोबर या अ‍ॅलर्जी देखील नाहीशा होतात. खजूरामध्ये ऑर्गनिक सल्फर हे तत्व असते. या तत्वामुळे हवामानातील बदलांमुळे उद्भाविणाऱ्या अ‍ॅलर्जी नाहीशा होण्यास मदत मिळते. खजूरामध्ये असलेले पोटॅशियम हृदयाच्या आरोग्याकरिता अतिशय उपयुक्त आहे. खजूरामध्ये ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज सारख्या

नैसर्गिक शर्करा आहेत, ज्यांच्यामुळे शरीराला आवश्यक ती उर्जा मिळते. तसेच यामध्ये कॅलरीजची मात्राही अतिशय माफक आहे. खजूरामध्ये असलेल्या सेलेनियम, तांबे आणि मॅग्नेशियम मुळे शरीरातील हाडे मजबूत राहण्यास मदत होते. गर्भारशी महिलांकरिताही खजूर अतिशय उपयुक्त आहे. याच्या सेवनाने गर्भारशी महिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला अनिमिया होण्याचा धोका उद्भवत नाही. तसेच गर्भाशयाच्या स्नायूंना पोषण मिळून प्रसूतीही सोपी होते. खजूरामध्ये असलेल्या लिनोलिक अ‍ॅसिड मुळे प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव नियंत्रित राहतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in