"EVM जिवंत आहे की मेलीये..." पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

"४ जूनला निकाल सुरु होता. मला अनेकांचे कॉल येत होते. मी म्हटलं, ते आकडे वगैरे राहूद्या...मला हे सांगा ईव्हीएम जीवंत आहे की मेलं?..." नेमकं काय म्हणाले मोदी?
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीFPJ
Published on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरून विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. शुक्रवारी जुन्या संसद भवनात आयोजित एनडीए आघाडीच्या नवनियुक्त खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते. विरोधी पक्ष सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करत होते, मात्र लोकसभा निवडणूकीच्या निकालांनी त्यांना शांत केलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 'ईव्हीएम जिवंत आहे की मेलं?' असा प्रश्न करत त्यांनी विरोधकांना डिवचलं.

नेमकं काय म्हणाले मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले की, "४ जूनला निकाल सुरु होता. मला अनेकांचे कॉल येत होते. मी म्हटलं, ते आकडे वगैरे राहूद्या...मला हे सांगा ईव्हीएम जिवंतआहे की मेलं? कारण या लोकांनी (विरोधी पक्ष) ठरवलं होतं की, भारतातील लोकशाही आणि लोकशाही प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडावा. सतत ईव्हीएमला शिव्या दिल्या जात होत्या. मला तर वाटत होतं ईव्हीएमची अंत्ययात्रा वगैरे काढतायत की काय? मात्र ४ जून येता येता त्यांच्या तोंडाल कुलूप लागलं. ईव्हीएमनं त्यांना गप्प केलं. हीच ताकद आहे भारतीय लोकशाहीची. हीच ताकद आहे भारताच्या निपक्षपातीपणाची..."

ही एकच टोळी होती...

मोदी पुढे म्हणाले की, "या निवडणूकीदरम्यान मी पहिल्यांदाच पाहिलं की, प्रत्येक तिसऱ्या दिसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा, यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले जात होते. ही एकच टोळी होती. लोकशाहीवर ज्यांचा अजिबात विश्वास नाही, असे लोक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून कशापद्धतीने अडथळा आणला जाईल, यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळं ऐन निवडणूकीदरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा हिस्सा न्यायालयात सामना करत होता. निवडणूकीत काहीही निकाल येऊद्या, जगाच्या समोर निवडणूक आयोगाचं नाव बदनाम करण्याचा हा डाव होता."

logo
marathi.freepressjournal.in