जय शाहंचे लग्न आहे का? राम मंदिर निमंत्रणावर कन्हैया कुमार म्हणाले, "अमित शाह..."

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना देखील या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, हा भाजप आणि आरएसएसचा राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत तेथे न जाण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
जय शाहंचे लग्न आहे का? राम मंदिर निमंत्रणावर कन्हैया कुमार म्हणाले, "अमित शाह..."

अयोध्या येथील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन बराच वाद सुरु आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना देखील या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, हा भाजप आणि आरएसएसचा राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत तेथे न जाण्याची भूमिका त्यांनी घेतली. आता राम मंदिराच्या निमंत्रणाबाबत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत असून यावरून नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या 'भारत जोडो न्याय यात्रा' संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले.

काय म्हणाले कन्हैया कुमार?

अयोध्येतील सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत बोलताना, "देव जेव्हा बोलावतो, तेव्हा लोक देवदर्शनाला जातातच. पण, आता काय कोणाचं लग्न आहे का? असं तर नाहीये की जय शाहंचे लग्न आहे आणि अमित शाह सर्वांना पत्रिका वाटतायेत. असं काही नाहीये... माझी आजी म्हणायची 'मन चंगा तो कठोती में गंगा', ईश्वर आपल्या वैयक्तिक आस्थेचा विषय आहे, प्रदर्शनाचा नाही", अशी प्रतिक्रिया कन्हैया कुमार यांनी 22 तारखेच्या कार्यक्रमाबाबत बोलताना दिली.

हा राजकीय कार्यक्रम-

ते जे करत आहेत त्याविषयी संपूर्ण देशाला माहिती आहे. 22 तारखेचा राजकीय कार्यक्रम आहे. काँग्रेसने राजकीय कार्यक्रमात न जाण्याची भूमिका घेतली आहे. मंदिरात का नाही जाणार? नक्की जाणार. भारत जोडो न्याय यात्रेतच आपण बघू शकतात की आम्ही हजारो शेकडो मंदिरात जाऊ. तसेच, मशिदी, गुरुद्वारा, चर्च मध्येही जाणार, असेही ते म्हणाले.

काँग्रेस हा सर्व धर्मांचा पक्ष-

काँग्रेस हा सर्व धर्माचा पक्ष आहे. आपण काँग्रेसचे नेहरुजींचे पहिले कॅबिनेट बघीतले तर त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी होते, आंबेडकरजीही होते, मौलाना अबुल कलाम आजाद होते, जॉन मथाईही होते, असे म्हणत फक्त काँग्रेस 'भारत जोडो न्याय यात्रा' काढू शकते, कारण काँग्रेस हा सर्वांचा पक्ष आहे, असे कन्हैया यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in