ISIचे हेरगिरी रॅकेट उद्ध्वस्त; ११ जणांना अटक

सीमावर्ती भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, थेट पाकिस्तानशी संबंध असलेले एक मोठे हेरगिरीचे जाळे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उद्ध्वस्त केले आहे.
ISIचे हेरगिरी रॅकेट उद्ध्वस्त; ११ जणांना अटक
ISIचे हेरगिरी रॅकेट उद्ध्वस्त; ११ जणांना अटक
Published on

नवी दिल्ली : सीमावर्ती भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, थेट पाकिस्तानशी संबंध असलेले एक मोठे हेरगिरीचे जाळे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उद्ध्वस्त केले आहे. सीमेपलीकडे बसलेले हँडलर्स उत्तर भारतातील लष्करीदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवर बसवण्यात आलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने भारतीय लष्कराच्या हालचालींचे रिअल-टाइम मॉनिटरिंग करत होते, अशी माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली.

या हेरगिरीच्या जाळ्याने पंजाबमधील कपूरथला, जालंधर, पठाणकोट, पतियाळा आणि मोगा; हरियाणातील अंबाला; जम्मू-काश्मीरमधील कठुआ; आणि राजस्थानमधील बिकानेर व अलवर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आपले जाळे पसरवले होते. ही सर्व शहरे लष्करी छावण्या, आंतरराष्ट्रीय सीमेची जवळीक आणि लष्करी रसद व तुकड्यांच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॅमेरे जाणीवपूर्वक लष्करी तळ, महामार्ग आणि सीमेला जोडणाऱ्या पायाभूत सुविधांजवळ बसवण्यात आले होते. या उपकरणांद्वारे मिळणारे लाईव्ह फुटेज थेट पाकिस्तानात पाठवले जात होते. यामुळे शत्रूला भारतीय लष्कराची प्रत्येक हालचाल घरात बसून पाहणे शक्य झाले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन टप्प्यांत ही कारवाई केली. यात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९ सीसीटीव्ही कॅमेरे, ४ पिस्तूल (३ विदेशी बनावटीची) आणि २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले की, हे कॅमेरे सौरऊर्जेवर चालणारे असल्याने दुर्गम भागातही वीजपुरवठ्याशिवाय सतत कार्यरत राहत होते. बनावट ओळखपत्रांवरून मिळवलेल्या सिमकार्डचा वापर करून हे कॅमेरे मोबाईल ॲप्सशी जोडले गेले होते, ज्यामुळे थेट पाकिस्तानात डेटा ट्रान्सफर करणे सोपे झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in