ISI पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पोलिसांवर हल्ल्याचा कट रचणारे आणखी ५ जण अटकेत

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या पाठिंब्याने भारतात घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या एका आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
ISI पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पोलिसांवर हल्ल्याचा कट रचणारे आणखी ५ जण अटकेत
ISI पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पोलिसांवर हल्ल्याचा कट रचणारे आणखी ५ जण अटकेत(Photo-X/@ANI)
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या पाठिंब्याने भारतात घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या एका आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानमधील गँगस्टर शाहझाद भट्टी याच्याशी संबंधित असलेल्या आणखी पाच संशयितांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. गेल्या महिन्यात ७ मे रोजी ‘ऑपरेशन गँग बस्ट २.०’ अंतर्गत या मॉड्यूलच्या तीन सदस्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण अटकेतील आरोपींची संख्या आठ झाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करणे, पोलीस ठाण्यांची व सुरक्षा यंत्रणांची रेकी करणे, तसेच ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’ या कथित दहशतवादी संघटनेचा प्रचार करणारे पोस्टर्स आणि ग्राफिटी (भिंतींवरील चित्रे) दिल्ली-एनसीआर परिसरात लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

शस्त्रसाठा

पोलिसांनी या कारवाईदरम्यान ५ पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, देशविरोधी पोस्टर्स आणि डिजिटल साहित्य जप्त केले आहे. या डिजिटल साहित्यामध्ये पोलिसांना धमकावणारे आणि संभाव्य लक्ष्यांची रेकी केल्याचे व्हिडीओ सापडले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in