दिल्लीतील एका घोषणेमुळे इस्रायल-हमास युद्ध अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मोठा दावा

अमेरिकेत एका पत्रकार परिषदेत जो बायडेन यांनी हा दावा केला. हमासने इस्रायलवर जो हल्ला केला
 दिल्लीतील एका घोषणेमुळे इस्रायल-हमास युद्ध 
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मोठा दावा

नवी दिल्ली : अलीकडेच दिल्लीत जी-२० परिषद झाली. या परिषदेदरम्यान भारत-मिडल ईस्ट-युरोप आर्थिक कॉरिडोरची घोषणा झाली. हे सुद्धा हमासने इस्रायलवर हल्ला करण्यामागचे एक कारण आहे, असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला असला, तरी त्यांच्याकडे पुराव्याचा आधार नाही. बायडेन यांनी स्वत: सांगितले आहे की, तो त्यांचा अंदाज आहे. त्या आधारावर मी हे मूल्यांकन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत एका पत्रकार परिषदेत जो बायडेन यांनी हा दावा केला. हमासने इस्रायलवर जो हल्ला केला, त्यामागे भारत-मीडिल ईस्ट-युरोप आर्थिक कॉरिडोरसुद्धा एक कारण असू शकते. माझ्याकडे याचा कुठला पुरावा नाहीय, पण माझा आतला आवाज मला सांगतोय, इस्रायल क्षेत्राच्या एकीकरणासाठी आम्ही काम करतोय हे सुद्धा हल्ल्यामागचे एक कारण असू शकते. दिल्लीत आयोजित जी-२० परिषदेत नव्या आर्थिक कॉरिडोरची घोषणा झाली. या कॉरिडोरची घोषणा भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, यूएर्इ, फ्रान्स, जर्मनी यांनी संयुक्तपणे केली. चीनच्या बेल्ट अँड रोडला विकल्प म्हणून या घोषणेकडे पाहिले जात होते. या कॉरिडोरच्या माध्यमातून आखाती देशांसोबतही आपण जोडले जाणार आहोत. युरोपही जोडले जाईल, असे बायडेन यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in