खासगी ‘अग्निबाण’ रॉकेटचे प्रक्षेपण तिसऱ्यांदा रद्द

अग्निबाण सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या (सॉर्टेड) चाचणी प्रक्षेपणाचा २२ मार्चपासून रविवारी तिसरा प्रयत्न होता. शनिवारी सकाळी ७.४५ वाजता चाचणी प्रक्षेपणाचा दुसरा प्रयत्नही यशस्वी होऊ शकला नाही. अग्निबाण हे दोन टप्प्यांचे, अर्ध-क्रायोजेनिक प्रक्षेपण वाहन आहे.
खासगी ‘अग्निबाण’ रॉकेटचे प्रक्षेपण तिसऱ्यांदा रद्द

नवी दिल्ली : चेन्नईस्थित खासगी अंतराळ संशोधन कंपनी ‘अग्निकुल कॉसमॉस’ने रविवारी आपल्या ‘अग्निबाण’ रॉकेटचे प्रक्षेपण तांत्रिक कारणांमुळे रद्द केले. ‘अग्निबाण’चे प्रक्षेपण रद्द होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. कंपनीने प्रक्षेपणाची पुढील तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’मधील ‘अग्निकुल लाँच पॅड’वरून रविवारी पहाटे ५.३० वाजता प्रक्षेपण होणार होते. परंतु, ते ७.४५ वाजता पुढे ढकलण्यात आले. अग्निबाण सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या (सॉर्टेड) चाचणी प्रक्षेपणाचा २२ मार्चपासून रविवारी तिसरा प्रयत्न होता. शनिवारी सकाळी ७.४५ वाजता चाचणी प्रक्षेपणाचा दुसरा प्रयत्नही यशस्वी होऊ शकला नाही. अग्निबाण हे दोन टप्प्यांचे, अर्ध-क्रायोजेनिक प्रक्षेपण वाहन आहे. ते सुमारे ७०० किमीच्या कक्षेत ३०० किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेऊ शकते. त्यासाठी ‘अग्निलेट’ नावाचे स्वदेशात विकसित केलेले इंजिन वापरले आहे. त्यासाठी थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in