स्वदेशी सेमी-क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकसित; 'इस्रो'ची अजोड कामगिरी

अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने शनिवारी मैलाचा दगड पार केला. अंतराळ यानासाठी लागणारे स्वदेशी 'सेमी क्रायोजनिक' इंजिन 'इस्रो'ने विकसित करण्यात यश मिळवले आहे.
स्वदेशी सेमी-क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकसित; 'इस्रो'ची अजोड कामगिरी
स्वदेशी सेमी-क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकसित; 'इस्रो'ची अजोड कामगिरीPhoto : X
Published on

बंगळुरू : अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने शनिवारी मैलाचा दगड पार केला. अंतराळ यानासाठी लागणारे स्वदेशी 'सेमी क्रायोजनिक' इंजिन 'इस्रो'ने विकसित करण्यात यश मिळवले आहे.

हे तंत्रज्ञान भारताला एकेकाळी नाकारण्यात आले होते, असे 'इस्रो'चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले की, गगनयान मोहिमेत भारत कोणतीही त्रुटी ठेवू इच्छित नाही. मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वी सर्व तंत्रज्ञान व सुरक्षा यंत्रणांची चाचणी केली जाईल. २४ जून प्रपोल्शन संकुलात सेमी २०२६ रोजी तमिळनाडूतील क्रायोजिनिक इंजिनच्या पॉवरहेड महेंद्रगिरी येथील 'इस्रो'च्या आर्टिकलच्या १७५ टन थ्रस्ट स्तरावर 'हॉट टेस्ट' चाचणी करण्यात आली. या चाचणीत इंजिनाच्या सर्व यंत्रणा सामील असतात, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देश 'गगनयान' मोहिमेच्या पहिल्या मानवरहित चाचणीसाठी तयारी करत आहे. यासोबतच चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणणारी 'चांद्रयान-४' मोहीम आणि जपानसोबत मिळून राबवण्यात येणारी 'चांद्रयान-५' ही दीर्घकालीन मोहीम, ज्यात जड रोव्हरचा समावेश असेल.

तंत्रज्ञान नाकारल्याने स्वदेशी क्षमता बळकट !

'आम्ही क्रायोजेनिक रॉकेट इंजिन विकसित केले आहे, जे तंत्रज्ञान भारताला नाकारले गेले होते,' असे नारायणन यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, भारताने तीन क्रायोजेनिक प्रोपल्शन सिस्टिम्स विकसित करून तंत्रज्ञान नाकारण्याच्या घटनेचे रूपांतर तांत्रिक नेतृत्वात केले आहे आणि या प्रक्रियेत अनेक जागतिक विक्रमही प्रस्थापित केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in