

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी इतिहास रचत देशाचा पहिला भू-स्थिर कक्षेतील प्रगत भू-निरीक्षण उपग्रह 'ईओएस-०५' यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. जीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने २,३०० किलोग्रॅमहून अधिक वजनाचा हा उपग्रह अत्यंत अचूकपणे अपेक्षित कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे.
सर्वात वजनदार उपग्रह
सामान्यत: भू-निरीक्षण उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत असतात, मात्र RDaSm-05 उपग्रह पृथ्वीपासून तब्बल ३६,००० किमी उंचावर असलेल्या भू-स्थिर कक्षेत तैनात केला जाईल. येथे त्याचा वेग पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाशी तंतोतंत जुळेल.
२,३६७ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह जीएसएलव्ही रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे.हा उपग्रह म्हणजे कोणतीही 'गुप्तचर यंत्रणा' किंवा 'स्पाय सॅटेलाइट' असल्याचा दावा इस्रोने फेटाळून लावला आहे.