‘गगनयान’ मोहिमेंतर्गत कुपीची यशस्वी चाचणी

इस्त्रोने ‘गगनयान’ मिशनची तयारी वेगाने सुरू केली आहे. रविवारी पॅराशूटवर आधारित हवेतून जमिनीवर कुपी टाकण्याचे यंत्रणेचे यशस्वी प्रक्षेपण केले. या चाचणीत सैन्य दलाने इस्त्रोला मदत केली.
‘गगनयान’ मोहिमेंतर्गत कुपीची यशस्वी चाचणी
Photo : X (@ISROSpaceflight)
Published on

बेंगळुरू : इस्त्रोने ‘गगनयान’ मिशनची तयारी वेगाने सुरू केली आहे. रविवारी पॅराशूटवर आधारित हवेतून जमिनीवर कुपी टाकण्याचे यंत्रणेचे यशस्वी प्रक्षेपण केले. या चाचणीत सैन्य दलाने इस्त्रोला मदत केली.

‘इस्त्रो’ ने सांगितले की, गगनयान मिशनसाठी पॅराशूटवर आधारित जमिनीवर ‘कुपी’ टाकण्याची चाचणी रविवारी घेतली. यात भारतीय हवाई दल, डीआरडीओ, भारतीय नौदल व भारतीय तटरक्षक दलाने संयुक्तरित्या सहभाग घेतला.

गगनयान मिशन काय आहे?

गगनयान ही भारताची पहिला अंतराळ मोहीम आहे. या अंतर्गत चार अंतराळ प्रवाशांना अंतराळात पाठवले जाईल. यंदा मानवरहित परीक्षण उड्डाण केले जाईल. यात ‘व्योममित्र’ यंत्रमानव पाठवला जाईल. या मोहिमेत ४०० किमीपर्यंत पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत माणसाला अंतराळात पाठवले जाईल. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाईल. यासाठी लागणाऱ्या ‘एसएमपीएस’ चे काम नुकतेच पूर्ण झाले.

२०२७ मध्ये भारत मानवयुक्त अंतराळात उड्डाण करेल. त्यानंतर २०२८ मध्ये चंद्रयान-४, शुक्र मोहिमेसाठी यान रवाना होईल. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक अंतराळात पाठवले जाईल. तर २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर पाठवला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in