इस्रोने इंग्लंडच्या ‘वन वेब’ कंपनीचे ३६ उपग्रह शनिवार-रविवारी रात्री अंतराळात यशस्वीपणे सोडले. जीएसएलव्ही-एमके-३ या रॉकेटने या क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोचे हे पूर्ण व्यावसायिक मिशन होते.
या क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून करण्यात आले. इस्रोची व्यावसायिक कंपनी ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ने हे उपग्रह सोडण्यासाठी वन वेबसोबत कंत्राट केले होते, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन डी. यांनी दिली.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, एलव्हीएम-३ हे रॉकेट ४३.५ मीटर लांब असून आणि त्यात आठ हजार किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच २०२३ मध्येही एलव्हीएम-३द्वारे आणखी ३६ उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. ब्रिटनबरोबर झालेल्या १०८ उपग्रहांच्या करारांतर्गत पहिल्या टप्प्यात ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत.