‘ईओएस-०८’चे यशस्वी प्रक्षेपण

‘इस्त्रो’ने शुक्रवारी देशातील सर्वात छोटे रॉकेट ‘एसएलएलव्ही-डी३’च्या माध्यमातून ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रहा’चे (ईओएस-०८) यशस्वी प्रक्षेपण केले.
‘ईओएस-०८’चे यशस्वी प्रक्षेपण
X
Published on

श्रीहरीकोटा : ‘इस्त्रो’ने शुक्रवारी देशातील सर्वात छोटे रॉकेट ‘एसएलएलव्ही-डी३’च्या माध्यमातून ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रहा’चे (ईओएस-०८) यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून सकाळी ९.१७ वाजता त्याचे प्रक्षेपण झाले, अशी माहिती ‘इस्त्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेपासून ४७५ किमीवर सोडला आहे. तो एक वर्ष काम करणार असून, पर्यावरण व नैसर्गिक आपत्तीची अचूक माहिती देण्याचे काम हा उपग्रह करणार आहे. हा उपग्रह १५ ऑगस्टला पाठवला जाणार होता, मात्र एक दिवस उशीरा त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.

उपग्रहात तीन ‘पेलोड’

पृथ्वी निरीक्षण उपग्रह (ईओएस-०८) असा उपग्रह आहे, जो पृथ्वीवर लक्ष ठेवेल. कोणतेही नैसर्गिक संकट येण्यापूर्वी तो इशारा देणार आहे. या उपग्रहाचे वजन १७५.५ किलो आहे. यात तीन पेलोड आहेत. इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड (ईओआयआर), दुसरा ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम-रिफ्लेक्टोमेट्री पेलोड (जीएनएसएस-आर) आणि तिसरा एसआयसी यूवी डोसिमीटर आहे.

इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोडला दिवस-रात्र फोटो काढण्यासाठी डिझाइन केले आहे. आग आणि ज्वालामुखीची माहिती देण्यासाठी हा उपग्रह तयार केला आहे. महासागरात पृष्ठभागावरील हवा, पुराची माहिती देण्यासाठी रिमोट सेन्सिगची सुविधा या उपग्रहात आहे.

logo
marathi.freepressjournal.in