आयटी, बँकांच्या समभागांची चांगली विक्री, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट

शेअर बीएसई सेन्सेक्स ९८ अंक किंवा ०.१८ टक्का घसरुन ५३,४१६.१५ वर बंद झाला.
आयटी, बँकांच्या समभागांची चांगली विक्री, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि बँकांच्या समभागांची विक्री झाल्याने गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर वधारलेला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट झाली.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ९८ अंक किंवा ०.१८ टक्का घसरुन ५३,४१६.१५ वर बंद झाला. दिवसभरात त्याने ५३,८६१.२८ ही कमाल आणि ५३,१६३.७७ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २८ अंक किंवा ०.१८ टक्का घसरुन १५,९३८.६५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत ॲक्सीस बँकेचा समभाग १.७४ टक्के घसरला. तर त्यापाठोपाठ एचसीएल टेक्नॉलॉजीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो,अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसी यांच्या समभागात घसरण झाली. तर दुसरीकडे सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, मारुती सुझुकी इंडिया, कोटक महिंद्रा बँक, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात शांघाय, सेऊलमध्ये घसरण तर टोकियोमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घसरण तर अमेरिकन बाजारात बुधवारी घट झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.९७ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव ९७.६१ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून भांडवली बाजारात विक्रीचा मारा सुरु असून बुधवारी २,८३९.५२ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in