चनप्रीतसिंगने काँग्रेस, तृणमूल, भाजपसाठीही काम केल्याचे स्पष्ट; 'आप'चे नेते भारद्वाज यांचा दावा

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेला आरोपी चनप्रीतसिंग याने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षांसाठीच नव्हे तर भाजपसाठीही काम केले असल्याचा दावा मंगळवारी 'आप'ने केला.
चनप्रीतसिंगने काँग्रेस, तृणमूल, भाजपसाठीही काम केल्याचे स्पष्ट; 'आप'चे नेते भारद्वाज यांचा दावा
Published on

नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेला आरोपी चनप्रीतसिंग याने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षांसाठीच नव्हे तर भाजपसाठीही काम केले असल्याचा दावा मंगळवारी 'आप'ने केला. असे असतानाही भाजप 'आप' आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही 'आप'ने म्हटले आहे.

मद्यधोरण घोटाळा मनी लाँड्रिंगप्रकरणी सोमवारी ईडीने चनप्रीतसिंग याला अटक केली, त्याने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी निधी वापरल्याचे उघड झाले. भाजप आप आणि केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला. चनप्रीतसिंग याला गेल्या वर्षी सीबीआयने अटक केली होती, मात्र त्याला गेल्या वर्षीच जामीनही मिळाला, त्याने विविध पक्षांसाठी काम केले आहे, हे आपले म्हणणे नसून सीबीआयच्या दस्तावेजातच तसे नमूद केले आहे, असेही भारद्वाज म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in