घराणेशाही... भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत रुजलेली - शशी थरूर

लोकसभा निवडणुकीच्या रॅलींदरम्यान मोदींच्या घराणेशाहीविरोधी मोहिमेची खिल्ली उडवत थरूर यांनी दावा केला की काही प्रमुख नेते वगळता भाजपमधील सर्व मंत्री आणि खासदार हे भाजपच्या इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे पुत्र किंवा कन्या आहेत, असे शशी थरूर म्हणाले.
घराणेशाही... भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत रुजलेली - शशी थरूर

थिरुवअनंतपूरम : काँग्रेस व त्यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतील पक्षामध्ये घराणेशाही असल्याच्या संबंधात व राजकारणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असणाऱ्या जोरदार टीकेच्या भडिमाराला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वेगळ्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. घराणेशाहीच्या प्रथेबद्दल बोलताना त्यांनी ती भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत रुजलेली आहे, असे प्रतिपादन केले.

ही प्रथा केवळ काँग्रेसमध्येच नव्हे तर भाजपमध्येही रुजलेली आहे, असे सांगत थरूर यांनी देशातील पक्षांमध्ये घराणेशाहीचे राजकारण जे आहे ते भारताच्या संस्कृतीचा एक भाग असल्याचे सांगितले आणि असे सुचवले की ही एक सामान्य प्रथा आहे, त्यात असामान्य असे काही नाही.

थरूर यांनी एका मुलाखतीत या विषयावर हे प्रतिपादन केले. इतकेच नव्हे तर ते म्हणाले की, तुलनेने सामान्य गोष्ट आहे की भारतात, पाश्चिमात्य देशांपेक्षा कितीतरी जास्त, वडील आपल्या मुलाने त्याच्या व्यवसायाचे अनुसरण करावे अशी अपेक्षा करतात आणि म्हणून ते पुढे जाण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये 'घराणेशाही'ची एक विशिष्ट पातळी आहे हे आश्चर्यकारक नाही.

थरूर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या रॅलींदरम्यान मोदींच्या घराणेशाहीविरोधी मोहिमेची खिल्ली उडवत थरूर यांनी दावा केला की काही प्रमुख नेते वगळता भाजपमधील सर्व मंत्री आणि खासदार हे भाजपच्या इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे पुत्र किंवा कन्या आहेत.

ते म्हणाले की, मला प्रामाणिकपणे मोदींनी इतर पक्षांमधील 'घऱाणेशाही'वर हल्ला चढवताना पण स्वतःच्या पक्षातल्या परिवाराला प्रोत्साहन देताना काही विशेष सातत्य दिसत नाही. त्यांच्या पक्षात खासदार, मंत्री आणि इतर लोक आहेत जे भाजपचे इतर ज्येष्ठ पुत्र किंवा कन्या आहेत. थरुर यांनी घराणेशाहीचा बचाव केला की इंडिया आघाडीतील बहुतेक नेते घराणेशाहीचा भाग आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in