
नवी नाणी लाॅन्च करण्यासोबतच पीएम मोदींनी 'जन समर्थ पोर्टल' लाॅन्च केले आहे. जे सरकारी क्रेडिट योजनांना जोडणारे एक-स्टॉप डिजिटल पोर्टल आहे. जन समर्थ पोर्टल हे अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ आहे जे लाभार्थ्यांना थेट कर्जदारांशी जोडते. या पोर्टलच्या उद्दिष्टाचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने वेगवेगळ्या मंत्रालयांच्या वेगवेगळ्या वेबसाइटला भेट देण्यापेक्षा भारत सरकारच्या एका पोर्टलवर पोहोचणे चांगले आहे आणि त्याची समस्या सोडवली जाऊ शकते.
मोदी म्हणाले की, हे पोर्टल केवळ विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांचे जीवन सुकर करेल असे नाही तर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यातही मदत करेल. विद्यार्थ्यांना कोणत्या सरकारी योजनेचा सर्वाधिक फायदा होईल हे त्यांना कळेल आणि आम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकतो हेदेखील कळेल. तरुण, मध्यमवर्गीयांसाठी एंड-टू-एंड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून हे पोर्टल काम करेल. स्वयंरोजगारात महत्त्वाची भूमिका बजावेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या मंत्रालयांच्या वेगवेगळ्या वेबसाइटला भेट देण्याऐवजी भारत सरकारच्या एका पोर्टलवर पोहोचणे चांगले आहे आणि तिथेच समस्या सोडवली गेली पाहिजे. याच ध्येयाने 'जन समर्थ पोर्टल' आज सुरू करण्यात आले आहे. २१व्या शतकातील भारत लोककेंद्रित प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रगती करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ विकास प्रवासाचाही त्यांनी उल्लेख केला