जगदीप धनखड यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न ; देशाचे १४ वे उपराष्ट्रपती

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ बुधवारी संपला असून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विजयी
जगदीप धनखड यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न ; देशाचे १४ वे उपराष्ट्रपती

जगदीप धनखड हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांना शपथ दिली. जगदीप धनखड यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ बुधवारी संपला असून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झाले. त्यांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.

जगदीप धनखड हे देशाचे १४ वे उपराष्ट्रपती बनले आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा आज राष्ट्रपती भवनात संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे एकत्रित संख्याबळ ७८८ आहे. यापैकी सध्या वरिष्ठ सभागृहाच्या आठ जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले. या खासदारांनी मतदान केल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड विजयी झाले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनकड यांना 528 तर अल्वा यांना 182 मते मिळाली. त्याचवेळी 15 मते रद्द करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी ९२.९४ टक्के मतदान झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in