हा तर घटनाकारांचा विश्वासघात - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

राज्यघटनेतील उद्देशिकेत बदल शक्य नाही. आणिबाणीच्या उद्देशिकेत काळात 'धर्मनिरपेक्षता', 'समाजवाद' आणि 'एकात्मता' या शब्दांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे राज्यघटना रचनाकारांचा त्यातून विश्वासघात करण्यात आला, अशी टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केली.
हा तर घटनाकारांचा विश्वासघात - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
Published on

नवी दिल्ली: राज्यघटनेतील उद्देशिकेत बदल शक्य नाही. आणिबाणीच्या उद्देशिकेत काळात 'धर्मनिरपेक्षता', 'समाजवाद' आणि 'एकात्मता' या शब्दांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे राज्यघटना रचनाकारांचा त्यातून विश्वासघात करण्यात आला, अशी टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केली.

उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात राज्यघटनेच्या उद्देशिकेत समाविष्ट केलेले शब्द जखमेच्या फोडाप्रमाणे होते.

कोणत्याही राज्यघटनेची उद्देशिका ही त्याचा आत्मा असते. भारत सोडून अन्य कोणत्याही देशाच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेत बदल झालेले नाही. मात्र, भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेत १९७६ मध्ये ४२ व्या राज्यघटनेत बदल केले. त्यात 'समाजवादी' व 'धर्मनिरपेक्ष', 'अखंडता' हे शब्द जोडले गेले.

जे बदलले जाऊ शकत नव्हते, त्याला सहजपणे आणि कोणत्याही औचित्याशिवाय बदलले गेले. त्यावेळी अनेक विरोधी पक्षनेते तुरुंगात होते. त्यांना न्याय मिळणेही दुरापास्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यघटनेची निर्मिती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर मेहनत घेतली. त्यांनी यावर समर्पित भावनेने लक्ष केंद्रीत केले होते, असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपती यांनी सांगितले की, राज्यघटनेची उद्देशिका ही राज्यघटनेचे बीज आहे. त्यामुळे राज्यघटना अधिक भक्कम झाली. भारत सोडून अन्य कोणत्याही देशाच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेत बदल झाले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in