जम्मू-काश्मीरमध्ये ‘टार्गेट किलिंग’चे सत्र पुन्हा सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये ‘टार्गेट किलिंग’चे सत्र पुन्हा सुरू
Published on

जम्मू-काश्मीरमध्ये ‘टार्गेट किलिंग’चे सत्र पुन्हा सुरू झाले असून दहशतवादी जवानांसह काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. गुरुवारी राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर शुक्रवारी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी ‘एसपीओ’च्या घरात घुसून त्याला गोळ्या घातल्या. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. काश्मीरमध्ये २४ तासांतच हत्येची ही दुसरी घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

गुरुवारी बडगाममध्ये दहशतवाद्यांनी चदूरा तहसीलदार कार्यालयाचे लिपिक राहुल भट्ट यांच्या कार्यालयात घुसून त्यांना गोळ्या घातल्या. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील गुदुरा ​​येथील ‘एसपीओ’ रियाझ अहमद ठोकर यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांचाही रुग्णालयात नेले असता मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in