जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात लष्कराचे ‘कॅस्पर’ (सैन्य वाहन) सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून त्यामध्ये १० जवान शहीद झाले, असून १२ जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून १० जवान शहीदPhoto : X
Published on

भदेरवाह/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात लष्कराचे ‘कॅस्पर’ (सैन्य वाहन) सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून त्यामध्ये १० जवान शहीद झाले, असून १२ जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

लष्कराचे हे वाहन दोडा जिल्ह्यातील भद्रवाह-चंबा रोड मार्गावरून जात होते. अपघातावेळी या ‘कॅस्पर’ वाहनात एकूण १७ जवान प्रवास करत होते. ते सर्वजण एका उंच पर्वतीय पोस्टकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात झाला.

बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. दरीत कोसळलेल्या वाहनातून जवानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. जखमी सैनिकांना घटनास्थळी तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी उधमपूर येथे विमानाने हलवण्यात आले. जखमींपैकी किमान तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून, रस्त्याची अवस्था आणि हवामान यासह सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

दोडाची स्थिती संवेदनशील

दोडा जिल्हा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. जिल्ह्यात डोंगराळ आणि जंगली भाग जास्त असल्याने, परिसरात सतत दहशतवादी कारवाया सुरू असतात. गुप्तचर अहवालांनुसार, दोडा आणि शेजारच्या किश्तवार जिल्ह्यात ३०-३५ पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सक्रिय असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या भागात भारतीय सैन्याची सतत गस्त सुरू असते.

logo
marathi.freepressjournal.in