
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात खोल दरीत प्रवासी टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार, तर १७ जण जखमी झाले आहेत. पोंडाजवळ दोडा-भर्थ रस्त्यावर एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर हा टेम्पो दरीत कोसळला. ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
मोहम्मद अश्रफ, मंगता वाणी, अट्टा मोहम्मद, तालिब हुसैन, रफीका बेगम आदींचा सरकारी वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. १७ जखमींना रुग्णालयात दाखल केले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस व अन्य सुरक्षा दल मदतीसाठी आले. या दुर्घटनेप्रकरणी नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद आदींनी दु:ख व्यक्त केले.