जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ जवान शहीद, दोन जखमी

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांपासून चकमक सुरू असून शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले, तर दोन जवान जखमी जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांविरोधातली कारवाई अद्यापही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ जवान शहीद, दोन जखमी
Photo : X (@Mjibran71321630)
Published on

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांपासून चकमक सुरू असून शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले, तर दोन जवान जखमी जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांविरोधातली कारवाई अद्यापही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून ऑगस्टपासून दलांनी १ सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे दहशतवादी कोणत्या गटाचे होते अथवा त्यांची नावे काय आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या दोन जवानांची नावे प्रीतपालसिंग (लान्स नाइक) आणि हरमिंदरसिंग (शिपाई) अशी आहेत. या चकमकीत अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in