जम्मू आणि काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यातील कालाकोट भागात सध्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरु आहे. दोन्ही बाजूंकडून सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत ४ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, कॅप्टन रँकेचे अधिकारी या चकमकीत शहीद झाले आहेत. सुरुवातीला या चकमकित एक लष्करी जवान ठार झाल्याचं तसंच तीन जवान गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत्त होतं. या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या जवानांना मृत्यू झाला.
राजौरी-पूंचचे डीआयजी राहे हसिब मुघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी या भागात लपून बसले असल्याची खात्री लायक माहिती त्यांच्याकडे आहे. या दहशधवाद्यांना शोधून काढण्यासाठी स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान आणि सीआरपीएफचे जवान यांनी संयुक्त शोध मोहिम सुरु केली होती.
याचवेळी दहशतदवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्यानं ते गंभीरतित्या जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या भागात अजूनही गोळीबार हा सुरु आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिक्स स्वरुपाची सुरक्षा रक्षकांची कुमक मागवण्यात आली आहे.
काही काळापूर्वी राजौरी आणि पूंच हा भाग शांत होता. पण आता पुन्हा एकदा या भागात पाकपुसस्कृत दहशतवाद्यानी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून सातत्याने जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग केली जात आहे. गेल्याच आठवड्यात इथं झालेल्या गोळीबारात ८ दहशतवादी मारले गेले होते. उरी, कुलग्राम आणि राजौरीतील बुधाल भागात या चकमकी झाल्या होत्या.