जम्मू-काश्मीरमध्ये २ दशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कर, स्थानिक पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कर, स्थानिक पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

श्रीनगरस्थित चिनार कॉप्सने सोशल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. सतर्क जवानांना नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांनी घुसखोरांना आव्हान दिले. मात्र, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरादाखल लष्करांनी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना ठार केले.

यापूर्वीही २ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. लष्कराने १ ऑगस्ट रोजी या भागांत 'ऑपरेशन अखल' सुरू केले होते. तब्बल १२ दिवस चाललेल्या या मोहिमेत ९ ऑगस्ट रोजी दोन जवान शहीद झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in