

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आल्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या पहिल्याच निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले असून नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) तीन तर भाजपने एका जागेवर विजय मिळविला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार चौधरी मोहम्मद रमजान, सज्जाद किचलू आणि शमी ओबेरॉय यांनी विजय मिळवला, तर भाजपचे सत शर्मा हे विजयी झाले.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर झालेली ही राज्यसभा निवडणूक अतिशय महत्वाची होती. निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी तीन वेगवेगळ्या अधिसूचना काढल्या होत्या. दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणुका, तर दोन जागांसाठी एकत्र निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत चौधरी मोहम्मद रमजान (एनसी) यांना ५८ मते, सज्जाद किचलू (एनसी) यांना ५७ मते, गुरुविंदर सिंग उर्फ शम्मी ओबेरॉय (एनसी) यांना ३१ मते आणि सत शर्मा (भाजप) यांना ३२ मते मिळाली.