Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य

मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमएईआयएल) ने १३.१५३ किमी लांबीच्या झोजिला बोगद्यामध्ये अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य करून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य
‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य(Photo-X)
Published on

श्रीनगर : मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमएईआयएल) ने १३.१५३ किमी लांबीच्या झोजिला बोगद्यामध्ये अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य करून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे जगातील सर्वात लांब सिंगल-ट्यूब, द्विपदरी रस्ता बोगदा पूर्ण झाला आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून ११,५७८ फूट उंचीवर बांधला गेला असून, कठीण हिमालयीन परिस्थितीत केलेल्या अभियांत्रिकीचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.

हा प्रकल्प NHIDCL साठी MEIL द्वारे उभारला जात आहे. पूर्ण झाल्यानंतर श्रीनगर-कारगिल-लेह मार्गावर वर्षभर वाहतूक शक्य होईल. आतापर्यंत हिमस्खलन आणि बर्फामुळे हा मार्ग सहा महिने बंद राहत असे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या यशाला भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील ‘ऐतिहासिक दिवस’ असे संबोधले.

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या प्रकल्पामुळे लडाख-काश्मीरसाठी वर्षभर संपर्काचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितले.

मिनीमर्ग: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी बटन दाबून स्फोट घडवला आणि झाेजिला बोगद्याच्या खोदकामाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. लडाखमधील मिनीमर्ग येथे काश्मीर आणि लडाख दरम्यानच्या या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या वर्षभरात कोणत्याही हवामानात वापरता येईल असा हा रस्ता असेल.

logo
marathi.freepressjournal.in