'हिजबुल मुजाहिद्दीन'चा वॉन्टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टूला अटक; दिल्ली पोलिसांना मोठे यश

जावेद अहमद मट्टूची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्याची शोध मोहीम सुरू केली होती.
'हिजबुल मुजाहिद्दीन'चा वॉन्टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टूला अटक; दिल्ली पोलिसांना मोठे यश
Published on

'हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेचा वॉन्टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टू याला आज(4 जानेवारी) दिल्लीत अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही धडक कारवाई केली. जम्मू-काश्मीरमधील अनेक कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचा तपासयंत्रणांना संशय आहे. त्याची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्याची शोध मोहीम सुरू केली होती.

मट्टू हा जम्मू-काश्मीरच्या सोपोरचा रहिवासी आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल, मॅगझिन आणि चोरीची कार जप्त केली आहे.

दरम्यान, मागीलवर्षी स्वातंत्र्य दिनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात मट्टूचा भाऊ सोपोरमध्ये तिरंगा फडकवताना दिसत होता.

logo
marathi.freepressjournal.in