'जेईई-अ‍ॅडव्हांस्ड'चा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, आरोही देशपांडे मुलींमध्ये टॉपर!

भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'जेईई-अ‍ॅडव्हांस्ड २०२६' या परीक्षेचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. यामध्ये दिल्ली परिमंडळाच्या शुभम कुमार याने ३६० पैकी ३३० गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे, तर विद्यार्थिनींमध्ये आयआयटी दिल्ली परिमंडळाचीच आरोही देशपांडे २८० गुणांसह विद्यार्थिनींमध्ये देशात पहिली आली असून, तिने ऑल इंडिया रँक ७७ प्राप्त केला आहे.
'जेईई-अ‍ॅडव्हांस्ड'चा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, आरोही देशपांडे मुलींमध्ये टॉपर!
'जेईई-अ‍ॅडव्हांस्ड'चा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, आरोही देशपांडे मुलींमध्ये टॉपर!
Published on

नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'जेईई-अ‍ॅडव्हांस्ड २०२६' या परीक्षेचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. यामध्ये दिल्ली परिमंडळाच्या शुभम कुमार याने ३६० पैकी ३३० गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे, तर विद्यार्थिनींमध्ये आयआयटी दिल्ली परिमंडळाचीच आरोही देशपांडे २८० गुणांसह विद्यार्थिनींमध्ये देशात पहिली आली असून, तिने ऑल इंडिया रँक ७७ प्राप्त केला आहे.

या वर्षी एकूण ५६,८८० उमेदवार जेईई-अ‍ॅडव्हांस्ड परीक्षा उत्तीर्ण (पात्र) झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या एकूण उमेदवारांमध्ये १०,१०७ विद्यार्थिनी तर ४६,७७३ विद्यार्थी आहेत. या परीक्षेला बसलेल्या एका तृतीयपंथीय उमेदवाराला मात्र यश मिळू शकले नाही. याशिवाय, दिव्यांग प्रवर्गातून ३,०५२ उमेदवारांनी नोंदणी केली होती; त्यापैकी २,८६४ उमेदवार दोन्ही पेपर्ससाठी उपस्थित राहिले आणि ८८७ उमेदवार पात्र ठरले.

अव्वल मानांकन प्रथम क्रमांक आयआयटी दिल्ली झोनचा शुभम कुमार ३३० गुणांसह सामान्य गुणवत्ता यादीत देशात पहिला आला आहे. कबीर छिल्लर याने ३२९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. तर जतीन चहार याने ३१९ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. आयआयटी दिल्ली झोनचीच आरोही देशपांडे २८० गुणांसह विद्यार्थिनींमध्ये देशात पहिली आली असून, तिने ऑल इंडिया रँक ७७ प्राप्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in