झारखंडमध्ये आज मतमोजणी

झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षप्रणित रालोआ व झामुमोप्रणित इंडिया आघाडीत जोरदार चुरस आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून कल येण्यास सुरुवात होईल.
झारखंडमध्ये आज मतमोजणी
Published on

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षप्रणित रालोआ व झामुमोप्रणित इंडिया आघाडीत जोरदार चुरस आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून कल येण्यास सुरुवात होईल. झारखंडमध्ये यंदा ६७.७४ टक्के मतदान झाले आहे. २००० मध्ये झारखंड राज्य स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच विक्रमी मतदान यंदा झाले. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्वात पहिल्यांदा टपालाद्वारे झालेल्या मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी केली जाईल.

झारखंडची निवडणूक यंदा दोन टप्प्यात झाली. १३ नोव्हेंबरला ४३ मतदारसंघात, तर २० नोव्हेंबरला ३८ मतदारसंघात मतदान झाले होते. या निवडणुकीत १२११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in