सोरेन यांच्याकडील फ्रीज, स्मार्ट टीव्हीच्या पावत्यांचा ईडीकडून पुरावे म्हणून वापर

गेल्या महिन्यात सोरेन आणि अन्य चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ईडीने रांचीस्थित विक्रेत्याकडून पावत्या मिळवून त्या आरोपपत्राला जोडल्या आहेत. यामध्ये एक फ्रीज आणि स्मार्ट टीव्ही सोरेन यांनी संतोष मुंडा या व्यक्तीच्या नावे खरेदी केल्याबाबतच्या पावत्या आहेत.
सोरेन यांच्याकडील फ्रीज, स्मार्ट टीव्हीच्या पावत्यांचा ईडीकडून पुरावे म्हणून वापर
Published on

नवी दिल्ली/रांची

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ३१ कोटी रुपयांहून अधिक रकमेची ८.८६ एकर जागा बेकायदेशीरपणे संपादित केली, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला असून त्याच्या पुष्ट्यर्थ ईडीने सोरेन यांनी खरेदी केलेला फ्रीज आणि स्मार्ट टीव्ही यांच्या पावत्यांचा पुरावा म्हणून वापर केला आहे.

गेल्या महिन्यात सोरेन आणि अन्य चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ईडीने रांचीस्थित विक्रेत्याकडून पावत्या मिळवून त्या आरोपपत्राला जोडल्या आहेत. यामध्ये एक फ्रीज आणि स्मार्ट टीव्ही सोरेन यांनी संतोष मुंडा या व्यक्तीच्या नावे खरेदी केल्याबाबतच्या पावत्या आहेत. मुंडा यांनी ईडीला सांगितले की, आपण हेमंत सोरेन यांच्या ८.८६ एकर मालकीच्या जागेचे काळजीवाहू म्हणून गेल्या १४ ते १५ वर्षांपासून वास्तव्याला आहोत. मात्र, या जमिनीशी आपला संबंध नाही, असा दावा सोरेन यांनी केला आहे. तो खोडून काढण्यासाठी ईडीने मुंडा यांच्या जबाबाचा वापर केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in