Jio Air Fibre : मुकेश अंबानींची मोठी घोषणा ; गणेश चतुर्थीला होणार Jio Air Fiber लॉन्च

आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जिओ एअर फायबरबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
Jio Air Fibre : मुकेश अंबानींची मोठी घोषणा ; गणेश चतुर्थीला होणार Jio Air Fiber लॉन्च

जिओ जेव्हा पासून मार्केटमध्ये आला आहे तेव्हा पासून त्याने अनेक कंपन्यांना मागे टाकलं आहे. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जिओच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जिओ एअर फायबरबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

जिओच्या एअर फायबरची आता प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच, १९ सप्टेंबर रोजी जिओचं एअर फायबर लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि सर्व कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार आहे. जियो एअर फायबरच्या येण्यामुळे दूरसंचार क्षेत्रात खूप उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

मुकेश अंबानी म्हणाले आहे की, "जिओ एअर फायबरसाठी दररोज 150,000 कनेक्शन दिले जाऊ शकतात. Jio Air Fiber गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. Jio 5G मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यात कृषी, शिक्षण, एमएसएमई आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. कंपनीचे जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. Jio हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि त्यानं आपल्या ध्येयाकडे मोठी पावलं उचलली आहेत."

jio 5G चं रोलआउट जगभरातील कोणत्याही कंपनीपेक्षा सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे. Jio 5G हे ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात 85 टक्के 5G सेवा आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in