जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे बाजारमूल्य २.२ लाख कोटींवर

सहा महिन्यांपूर्वी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस त्याच्या मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडपासून विभक्त करण्यात आली
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे बाजारमूल्य २.२ लाख कोटींवर

मुंबई : जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (जेएफएसएल)च्या समभागांची ५२आठवड्यांचा उच्चांक गाठल्यानंतर कंपनीचे बाजारमूल्य प्रथमच २.२ लाख कोटींवर गेले आहे. अब्जोपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजची ग्रुपची ही दुसरी कंपनी ठरली आहे, जिचे बाजारमूल्य २.२ लाख कोटींवर गेले आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी जेएफएसएल समभागांनी १४.५० टक्क्यांच्या वाढीसह ३४७ रु.चा सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर दुपारी घसरण होऊन दिवसअखेरीस १० टक्के वधारला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) वर ९.६२ टक्क्यांच्या वाढीसह समभाग ३३१.२५ वर बंद झाला. समभागाच्या या मूल्यानुसार कंपनीचे बाजारमूल्य २.२ लाख कोटी रुपये आहे. दिवसभरात हा समभाग १४.५० टक्के वधारून ३४७ या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य बीएसईवर २७,९२२.६९ कोटींनी वधारून २,२०,४५८.९६ कोटी रु. झाले.

सहा महिन्यांपूर्वी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस त्याच्या मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडपासून विभक्त करण्यात आली होती. डिमर्जरनंतर, जिओ फायनान्शिअलच्या शेअरची किंमत किंमत शोध यंत्रणा अंतर्गत २६१.८५ रुपये निश्चित करण्यात आली. त्यानंतर, २१ ऑगस्ट २०२३ रोजी, कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) वर २६५ रु.वर सूचीबद्ध झाले. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर शेअर २६२ रु.वर सूचीबद्ध झाला.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने देखील २,९८९ रु. चा सर्वकालीन उच्चांक गाठला. दुपारी १२ वाजता आरआयएलचे शेअर्स ०.४८ टक्क्यांच्या वाढीसह २,९७७.४५ रु. वरून किंचित खाली घसरले. २०.१४ लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in