जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO विना OFS? १२ लाख कोटींचे मूल्यांकन; टॉप ३ मध्ये स्थान मिळवणार

डिजिटल सेवा पुरवठादार कंपनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’चा प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) - जो आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो - तो ‘ऑफर फॉर सेल’शिवाय येण्याची शक्यता आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO विना OFS? १२ लाख कोटींचे मूल्यांकन; टॉप ३ मध्ये स्थान मिळवणार
जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO विना OFS? १२ लाख कोटींचे मूल्यांकन; टॉप ३ मध्ये स्थान मिळवणार
Published on: 

नवी दिल्ली : डिजिटल सेवा पुरवठादार कंपनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’चा प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) - जो आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो - तो ‘ऑफर फॉर सेल’शिवाय येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही गुंतवणूकदाराने हिस्सेदारी विकण्याची किंवा कमी करण्याची इच्छा दर्शवलेली नाही, अशी माहिती या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड १२ लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह देशातील टॉप-तीन शेअर्समध्ये स्थान मिळवू शकते, असे त्यांनी सांगितले.

सूत्रानुसार, परदेशातील रोड शोदरम्यान मिळालेल्या प्रतिसादावरून, बाजार भांडवलात जेपीएलचा आयपीओ टॉप तीनमध्ये स्थान मिळवू शकतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in