J&K Attack : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमक ; लष्कराच्या तीन अधिकाऱ्यांना वीरमरण

कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक हुमायून भट असं शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत
J&K Attack : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमक ; लष्कराच्या तीन अधिकाऱ्यांना वीरमरण

जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. आज दिवसभर देखील लष्कराच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर कोबिंग ऑपरेशन राबवलं. यात एक जवान शहीद तर काही दहशतवादी ठार झाले होते. आताच मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नलसह तीन अधिकारी शहीद झाले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनेच दिलेल्या वृत्तानुसार, काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीची जोरदार फायरिंग झाली. यात देशाची मोठी हानी झाली आहे. या चकमकीत देशाने आपले तीन अधिकारी गमावल्याचं वृत्त समोर आलं आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक हुमायून भट असं शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. गोळीबारात या अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत होऊन नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हुमायून भट यांचा मृत्यू जास्त रक्तस्त्राव झाल्याने झाला असल्याचं देखील सांगण्यात आलं.

दहशतवाद्यांशी दोन हात करताना १९ RR युनिटचं नेतृत्व करताना कर्नल आणि मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला विरमरण आलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गडोले परिसरात मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला सुरुवात झाली. पण रात्री ती मागे घेण्यात आली होती. बुधवारी ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली होती. यावेली दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. यावेळी कर्नल सिंग समोरुन आपल्या टीमचे नेतृत्व करत असताना त्यांनी दहशथवाद्यांवर हल्ला केला. मात्र, दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना वीर मरण आलं.

logo
marathi.freepressjournal.in