जेके टायरचा तिमाही नफा २२७ कोटी; तिमाही कंपनी निकाल

कंपनीच्या बोर्डाने प्रति शेअर रु. १ चे दर्शनी मूल्य असलेला अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
जेके टायरचा तिमाही नफा २२७ कोटी; तिमाही कंपनी निकाल

नवी दिल्ली : जेके टायर अँड इंडस्ट्रीजने मंगळवारी सांगितले की, मजबूत विक्रीमुळे ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा तीन पटीने वाढून २२७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत टायर प्रमुख कंपनीला ६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

जेके टायर अँड इंडस्ट्रीजने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, वरील तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल वाढून ३,६८८ कोटी रुपयांवर पोहोचला असून मागील वर्षीच्या वरील तिमाहीत ३,६१३ कोटी रुपये होता.

कंपनीच्या बोर्डाने प्रति शेअर रु. १ चे दर्शनी मूल्य असलेला अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. जेके टायरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रघुपती सिंघानिया म्हणाले, आम्ही उत्पादन प्रीमियम, व्हॉल्यूम विस्तार आणि आमच्या उत्पादन मिश्रणावर केंद्रित लाभदायक वाढ साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

गोदरेज प्रॉपर्टीजचा तिमाहीत नफा ११ टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली : गोदरेज प्रॉपर्टीजने मंगळवारी डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ११ टक्क्यांनी वाढ नोंदवून ६२.७२ कोटी रुपये झाल्याचे जाहीर केले, तर तिमाहीत घरांची विक्री आणि बुकिंग उत्तम झाल्याने वार्षिक ७६ टक्क्यांनी वाढून ५,७२० कोटी रुपये झाली. रिॲल्टी फर्मचा निव्वळ नफा वर्षभरापूर्वी ५६.४० कोटी रुपये झाला होता. नियामक फाइलिंगनुसार, या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून ५४८.३१ कोटी रुपये झाले आहे जे मागील वर्षाच्या याच कालावधीत ४०४.५८ कोटी रुपये होते.

हेस्टर बायोसायन्सला १४.७७ कोटींचा निव्वळ नफा

मुंबई : हेस्टर बायोसायन्स लि. ही भारतातील अग्रगण्य प्राणी आरोग्य कंपन्यांपैकी एक असून लस आणि आरोग्य उत्पादनांमध्ये कंपनीने डिसेंबर २०२३ या संपलेल्या वित्तीय वर्ष २०२४ च्या नऊ महिन्यांसाठी १४.७७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीने २०२३ च्या ९व्या महिन्यातील १९८.८ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२४ च्या नवव्या महिन्यात ऑपरेशन्समधून २२५.३ कोटी महसूल प्राप्त केला असून १३ टक्क्यांनी त्यात वाढ झाली आहे. ईबीआयटीडीए २०२४ च्या नवव्या महिन्यात ३७.७३ कोटी रुपये झाला. एकत्रित परिणामांमध्ये नेपाळ आणि टांझानियामधील उपकंपन्यांच्या ऑपरेशन्सचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in