शिवजयंतीला जेएनयूमध्ये गोंधळ; छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यावरून वाद

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद
शिवजयंतीला जेएनयूमध्ये गोंधळ; छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यावरून वाद

शिवजयंतीनिमित्त पुन्हा एकदा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ एका वादामुळे चर्चेत आले आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेवरून वाद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हा वाद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविप आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा अभाविपचा आरोप केला. त्यानंतर अभाविप आणि जेएनयुच्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. अद्याप यासंदर्भात विद्यापीठाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

अभाविपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. परंतु, एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी प्रतिमेचा अवमान केला. प्रतिमेला घातलेला हारदेखील कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आल्याची माहिती अभाविपच्या महासचिवांनी दिली. तर, नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी संघटनने अभाविपने हल्ला केल्याचा आरोप केला. विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार, अभाविपच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा हॉस्टेलवर हल्ला केला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आव्हान केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in