
दिल्लीतील जेएनयू (JNU) अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यार्थ्यांनी बीबीसीच्या इंडिया-द मोदी क्वेश्चन (BBC india) या माहितीपटाच्या स्क्रीनिंगची घोषणा केली. मात्र, जेएनयू प्रशासनाने त्याला परवानगी नाकारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी संतप्त झाले होते. अभाविप आणि लेफ्टविंग विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचे समजते.
दरम्यान, माहितीपट दाखवण्याच्या नियोजित वेळेपूर्वीच वीजपुरवठा खंडित झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी 25 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता विद्यार्थी कुलगुरूंकडे तक्रार करणार आहेत.