भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ( J P Nadda) यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. नड्डा हे जून 2024 पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवल्या जातील, असेही पी. अमित शहा यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर नड्डा यांचे काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली होती. हिमाचल हे नड्डा यांचे गृहराज्य आहे. नड्डा यांच्या पराभवाचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रतिमेवर काही परिणाम होतो का, अशीही चर्चा होती.
मात्र, आज दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.