

नवी दिल्ली : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्य कांत हे सोमवाऱी शपथ घेणार आहेत. न्या. सूर्य कांत यांचा हा शपथविधी सोहळा खूप खास असेल कारण या कार्यक्रमाला ७ देशांचे मुख्य न्यायाधीस हजर राहणार आहेत.
या शपथ ग्रहण सोहळ्याला भूतान, केनिया, मॉरिशस, नेपाळ, मलेशिया आणि श्रीलंका येथील सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायमूर्ती आपल्या कुटुंबीयांसह हजर राहणार आहेत.
न्या. सूर्य कांत यांनी आपल्या निवासस्थानातील कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ते फक्त सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांवरच लक्ष केंद्रित करणार नसून संपूर्ण भारतातील उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील प्रलंबित खटले कमी करण्यावरही भर देणार आहेत.