यूट्यूबर ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढली

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेली हरयाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिची पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढवण्यात आली. ज्योतीला गुरुवारी सकाळी हिसार पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
यूट्यूबर ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढली
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेली हरयाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिची पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढवण्यात आली. ज्योतीला गुरुवारी सकाळी हिसार पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तिच्या रिमांडवरील चर्चा सुमारे दीड तास सुरू राहिली. त्यानंतर हिसार पोलिसांनी तिला आणखी ४ दिवसांची कोठडी वाढवली. सुनावणीनंतर, पोलिसांनी ज्योतीला मीडियाच्या नजरेपासून वाचवण्यासाठी फिल्मीस्टाईलने बाहेर नेले.

ज्योतीला १६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ५ दिवसांच्या रिमांडवर असताना, हिसार पोलिसांव्यतिरिक्त तिची एनआयए, मिलिटरी इंटेलिजेंस, आयबी आणि इतर गुप्तचर संस्थांनी चौकशी केली. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान ज्योती पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्योतीने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही. तपासावर परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी सगळा तपशील गुप्त ठेवलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in