भाजपच्या अंगणात 'कमल'नाथ?

२०१९ च्या निवडणुकीत जरी भाजपने राज्यातील उर्वरित २८ जागा जिंकल्या, तरी त्यांचा मुलगा नकुल नाथ याने ती जागा पटकावली होती.
भाजपच्या अंगणात 'कमल'नाथ?

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ शनिवारी दुपारी नवी दिल्लीत आल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आता अटकळ बांधली जात आहे, तसेच त्यामुळे ते भाजपमध्ये कधी प्रवेश करतील, याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये कमालीची उत्कंठा लागली आहे. मात्र यावर पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी खळबळ माजवू नका, असे काही असेल तर मी तुम्हाला आधी कळवीन. असे सांगून कमलनाथ यांनी तूर्तास भाजप प्रवेशाबद्दलची अटकळ कायम ठेवली आहे.

पत्रकारांशी त्यांच्या झालेल्या छोटेखानी संवादामध्ये त्यांनी हा संभाव्य बदल नाकारत नाही का, असे विचारले असता कमलनाथ म्हणाले की, तुम्ही उत्साहित होत आहात, पण मी उत्तेजित नाही. या बाजूला किंवा त्या बाजूला जे काही होईल वा असे काहीही असो, मी तुम्हाला आधी कळवीन.

गेल्या काही दिवसांपासून, कमलनाथ हे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा दौऱ्यावर होते. तेथून ते नऊ वेळा खासदार झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत जरी भाजपने राज्यातील उर्वरित २८ जागा जिंकल्या, तरी त्यांचा मुलगा नकुल नाथ याने ती जागा पटकावली होती.

नाथ भाजपमध्ये प्रवेश करू शकतात या अटकळींबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना विचारले असता त्यांनी जबलपूरमध्ये सांगितले होते की, मी शुक्रवारी रात्री कमलनाथ यांच्याशी बोललो, ते छिंदवाडा येथे आहेत. ज्या व्यक्तीने आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि इंदिरा गांधींना जनता पक्षाने तुरुंगात टाकले तेव्हा नेहरू-गांधी कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली अशी व्यक्ती कधी काँग्रेस आणि गांधी परिवार सोडेल, असे तुम्हाला वाटते का? असाही सवाल या संबंधात सिंग यांनी केला. गेल्या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यामुळे कमलनाथ यांना राज्यसभेत जागा न मिळाल्याने नाराजी आहे आणि राहुल गांधी यांचाही त्यांना विरोध आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलनाथ आणि भाजप यांच्यातील ‘डील’ काही कारणामुळे मध्यंतरी ढेपाळले होते. मात्र आता ते पुन्हा मार्गावर येत असल्याचे बोलले जात आहे. भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांकडूनही त्यासंबंधात दुजोरा दिला जात आहे. मात्र काही राजकीय निरीक्षकांच्या अंदाजानुसार जरी राहुल गांधी आणि त्यांच्यामध्ये दुरावा असला तरी कमलनाथ नंतर सोनिया गांधी यांना वारंवार भेटतही होते. मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठी ते सोनिया गांधी यांच्या संपर्कात होते. अन्य काही सूत्रांच्या मते, भाजपमध्ये कमलनाथ नव्हे तर नकुलनाथ जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाथ यांना पक्षाच्या मध्य प्रदेश युनिटचे प्रमुख म्हणून बदलण्यात आले, ज्यामध्ये भाजपने २३० सदस्यांच्या सभागृहात १६३ जागा जिंकून सत्ता कायम राखली. काँग्रेसला अवघ्या ६६ जागा जिंकता आल्या.

आयएएस वगळले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा आणि छिंदवाड्याचे खासदार नकुल नाथ भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या अटकळीने भोपाळपासून नवी दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप, दोन्ही नेते अफवांना दुजोरा देत अचानक राष्ट्रीय राजधानीला रवाना झाले. तशात कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी आपल्या सोशल मीडियावर दिलेल्या वैयक्तिक माहितीतून काँग्रेस (इंग्रजीमध्ये आयएनएस) हे शब्द वगळल्याने भाजप प्रवेशबाबत अधिक उत्कंठा लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in