वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : नुपूर शर्मा यांच्या बचावासाठी आता कंगनाची एंट्री

हा अफगाणिस्तान नाही, जिथे कोणी आपला मुद्दा मांडू शकत नाही.
वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : नुपूर शर्मा यांच्या बचावासाठी आता कंगनाची एंट्री
File PhotoANI

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्व स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता या प्रकरणामध्ये बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana) हिने देखील उडी मारली आहे. कंगनाने नुपूर शर्मा यांचे समर्थन करत म्हटले आहे की, हा अफगाणिस्तान नाही, जिथे कोणी आपला मुद्दा मांडू शकत नाही.

ती पुढे म्हणाली की, नुपूर यांना त्यांच्या मनातील बोलण्याची मुभा आहे, कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, मी नुपूर यांना दिलेल्या सर्व प्रकारच्या धमक्या पाहिल्या आहेत. जेव्हा हिंदू देवदेवतांचा दररोज अपमान होतो, तेव्हा आम्ही कोर्टात जातो, तेव्हा निदान आता तरी असे करू नका. हा अफगाणिस्तान नाही. आपण जनतेने निवडून दिलेल्या संपूर्ण व्यवस्थेत चालणाऱ्या सरकारमध्ये आहोत आणि त्याला लोकशाही असे म्हणतात. हे फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी आहे जे नेहमी ही गोष्ट विसरतात.

दरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली, या प्रकरणावरून गदारोळ वाढल्यानंतर भाजपने हे पाऊल उचलले. तर त्याचवेळी नुपूर शर्मा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. यानंतर नुपूर शर्मा यांना इस्लामिक कट्टरपंथीयांकडून सतत धमक्या येत आहेत, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in