कर्नाटकमध्ये १० मेला होणार मतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

कर्नाटकमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १०मेला मतदान होणार असून १३ मेला मतमोजणी होणार
कर्नाटकमध्ये १० मेला होणार मतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. १० मेला कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार असून १३ मेला मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तसेच, आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "कर्नाटकमध्ये २२४ विधानसभा मतदारसंघात 5 कोटींहून अधिक नोंदणीकृत मतदार असून राज्यभरात ५८,२८२ मतदान केंद्रे उभारणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल असणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख ही २४ एप्रिल असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in